भारतासारख्या स्वतंत्र आणि लोकशाही
प्रधान राष्ट्राची आज प्रगतीकडे चाललेली वाटचाल आणि आशिया खंडात असलेले
अत्यंत महत्वाचे स्थान पाहता पाकिस्तान सारख्या अंतर्गत अराजकता आणि
लोकशाहीचा मागमूस देशात भारताबद्दल द्वेष असणे साहजिक आहे.
सध्या भारत-पाकिस्तान यांच्यातले संबंध जास्त तणावपूर्ण बनले आहेत. कारण पाकिस्तानी सैनिकांनी ताबारेषा ओलांडून दोन भारतीय जवानांना ठार मारलं. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यातल्या एका जवानाचं धड आणि शिर वेगळं करून ते शिर घेऊन ते सैनिक पसार झाले. पाकिस्तानी सैनिकांच्या अशा प्रकारच्या आगळिकीनं भारतात संतापाची लाट पसरली. त्याला आपल्या लष्कर प्रमुखांनी दिलेले प्रत्युत्तर हे दर्शविते कि भारतीय सैन्याच्या मर्यादेला पण सीमा आहेत, आणि शासनाने सतत होणारया अश्या पाकिस्तानच्या कारवायांना आळाबंध घालण्यासाठी सैन्य दलाला उचित अशे अधिकार दिले आहेत.
सध्या आपल्यात अतिशय लोकप्रिय असलेले सुतोवाच असे कि “पाकिस्तान सोबत युद्ध पुकारा आणि पाकिस्तानला धडा शिकवा”, अनेक लोकांच्या मनात ही सुप्त इच्छा आहे की पाकिस्तानला आता धडा शिकवलाच पाहिजे पण प्रश्न असा आहे कि खरच “युद्ध” हाच एक पर्याय आहे का…? खरच आपल्या देशाला हे युद्ध परवडणारे आहे का..? २००१-२००२ साली दोन्ही देशांमध्ये झालेले ”Military Standoff“ आणि त्यात झालेला खर्च (“Land Mines” पेरत असताना झालेले सैनिकी नुकसान”) आपण विसरता कामा नये…आणि हेही आपण लक्षात घेतला पाहिजे कि खरच पाकिस्तान धडा घेईल का?
आपली लष्करी ताकद पाकिस्तानपेक्षा खूप बळकट आणि लोकशाहीचा आदर करणारी आहे.
A
.C . मध्ये बसून “युद्ध करा” असे म्हणणे किंवा “Facebook” वर निरर्थक आणि
आपल्या बुद्धीचे दिवाळखोर पण सिद्ध करणारे ”पोस्टिंग” करणे हे खूप सोपे
आहे.
No comments:
Post a Comment